‘मुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

नात्यातील काही प्रश्न अनुत्तरित राहिले, योग्य वेळी योग्य सुसंवाद झाला नाही तर त्या नात्यातील सुंदरता आपण गमावून बसतो, वेळप्रसंगी नात्यात टोकाचा दुरावा निर्माण होतो. विसंवादातून एखाद्या व्यक्तीचे जीवन नीरस होऊ शकते. अशाच एका नाते संबंधांतील संवेदनशील विषयावर सकारात्मक भाष्य करणारा सायको थ्रीलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मुड्स – Unpredictable’ असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी केले आहे.

एस स्क्वेअर एन्टरटेनमेंट प्रस्तुत ‘मुड्स – Unpredictable’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज पुण्यात लॉंच करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे निर्माते संतोष अंकुश चव्हाण,श्रावणी संतोष चव्हाण,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर, अभिनेता रितेश नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.